लोभी पुजार्‍याने स्वामी समर्थांना पुण्यस्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे

सेतुबंध रामेश्‍वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणार्‍या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजार्‍याने त्यांनाही हेच सांगितले. श्री स्वामी म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर, कोठुनि द्यावा तुम्हासी कर, व्यर्थ किरकिर करू नका. त्यावर पुजारी म्हणाला, धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान, विद्वत्ता सर्व निरर्थक त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता ज्याच्या जवळ धन, त्यालाच पुण्यस्नान घडेल. हे ऐकून श्री स्वामी समर्थ तात्काळ निघून गेले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top