मोठ काहीच मागणं स्वामी
फक्त प्रयत्नांना साथ द्या…
खचून गेलो असताना डोक्यावरती हात द्या,
भरकटलेल्या आयुष्याला योग्य दिशा द्या,
विस्कटलेल्या नशिबाला आकार द्या,
परीस्थिती कशीही असो… जिद्दीचे बळ द्या,
रात्रीचा दिवस / दिवसाची रात्र करून मेहनत करायची ताकद द्या,
घाबरलो असतानां धेर्य द्या,
डगमगलो सालो जरी तुमचा आधार द्या,
वार कितीही झाले तरी लढण्याची ताकद द्या,
लोकांना ओळखण्याची युक्ती द्या,
वाटेत कितीही काटे आले तरी पुढे जायचे धाडस द्या,
वेळ लागला तरी चालेल पण हाताला कष्टाचे फळ द्या,
अपयश पचविण्याची सहनशक्ती द्या,
यश साजरा करताना भूतकाळ ध्यानी असू द्या,
ज्यांच्या आनंदासाठी स्वप्नांच्या मागे धावतोय त्या माझ्या आई बाबांचे स्वप्न पूर्ण करून त्यांना मानसिक समाधान द्या,
स्वामी,
मोठ मागण काहीच नाही…
फक्त प्रयत्नांना साथ द्या…
II श्री स्वामी समर्थ II
Post Views: 49