मागणे हे माझे स्वामी तुजपाशी । विघ्न भजनासी येऊ नये ॥१॥

तुझाचि निरोप सर्वांसी मी देतो । तुझे नाम गातो आवडीने ॥२॥

तेथे ही उपाधी न बाधो सर्वथा । बापा दिनानाथा मागणे सांभाळावे ॥३॥

स्वामीसुत म्हणे तूचि बाप धनी । सांभाळी भजनी बालकासी ॥४॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top